उस्मानाबाद जिल्ह्याचे एकूण 90 स्वॕबचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते यापैकी 80 तपासणी अहवाल कालच प्राप्त झाले होते त्यामध्ये दोन रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे होते.75 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह तर त्यासोबतच ३ जणांचे अहवाल हे अनिर्णित अवस्थेत होते उर्वरित 10 जणांचे अहवाल येणे बाकी होते त्यापैकी ३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे.

त्यात एक 23 वर्षीय महिला, रा सुमबा ता. उस्मानाबाद, पूर्वीच्या कॉन्टॅक्ट मधील असून दोन पेशंट वय 40 वर्ष व 24 वर्षीय पुरुष रा वाटेफळ ता.परांडा येथील असून,कॉन्टॅक्ट मधील आहेत.उस्मानाबादचा पेशंट सिविल मध्ये असून परांड्याचे पेशंट वाटेफळ येथे क्वारंटाइन केलेले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या ही 76 वर पोहोचली आहे,यातील 54 रुग्णांवर ती विविध रुग्णालयात उपचार सुरु असून 19 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर तीन रुग्णांचा कोरोणामुळे मृत्यू झालेला आहे.