उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू; एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 62

0
124

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. बेडगा तालुका उमरगा येथील ६० वर्षीय वृद्धाचा उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडली होती.उस्मानाबाद येथे पुढील उपचारासाठी आणण्यात येणार होते मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात एकूण ६२ रुग्ण आढळून आले होते.

आज उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.काही वेळापूर्वी कोरोना दैनंदिन रिपोर्ट येऊन त्यामध्ये मागील आठ ते दहा दिवसापासून कधी नव्हे. तो उस्मानाबाद जिल्ह्यात आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नव्हता. मात्र अहवाल आल्यानंतर काही वेळातच येथील कोरोनाग्रस्त रुग्ण दगावल्याची माहिती मिळाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे या रुग्णावर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या एकूण 62 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून 47 रुग्णांवर उपचार सुरू होते त्यातील १ एक रुग्ण दगावला आहे तर १५ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.