उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या झाली 29

0
70

उस्मानाबाद, दि.‌ २३ : उस्मानाबाद जिल्ह्यात आज शनिवार दिनांक २३ मे रोजी आणखी नव्याने दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९ वर पोहचली असून त्यापैकी ५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्य स्थितीत २४ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज आढळलेल्या रुग्णामध्ये शिरढोण येथील ३३ वर्षीय महिला आणि मुरूम येथे २३ वर्षीय तरुणाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

उस्मानाबाद जिल्हयातील 41 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 34 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 4 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत आहेत व एका व्यक्तीचा स्वॅब परीपूर्ण न आल्यामुळे Reject करण्यात आला आहे.