उद्धव ठाकरे यांची संपत्ती प्रथमच आली जगासमोर , एकही वाहन नाही; वाचा सविस्तर-

0
118

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीबाबतची माहिती प्रथमच समोर आली आहे.त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातनुसार मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे स्थावर आणि जंगम मिळून ७८ कोटी १७ लाख ७१ हजार ९७२ रुपयांची,तर पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे स्थावर आणि जंगम मिळून ६५ कोटी ९ लाख २ हजार ७९१ रुपयांची अशी एकूण १४३ कोटी २६ लाख ७४ हजार ७६३ रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे.मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्याकडे वाहन नसल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमुद केले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या ( सोमवारी ) शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले.मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे स्थावर आणि जंगम मिळून ७८ कोटी १७ लाख ७१ हजार ९७२ रुपयांची,तर पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे स्थावर आणि जंगम मिळून ६५ कोटी ९ लाख २ हजार ७९१ रुपयांची अशी एकूण १४३ कोटी २६ लाख ७४ हजार ७६३ रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्यांनी विवरण खाते आणि हिंदू अविभक्त कुटुंब खाते अशा दोन स्वरूपात दाखवले आहे. स्वत:कडे रोख ७६ हजार ९२२ रुपये,तर हिंदू अविभक्त खात्यात ३९ हजार १२४ रुपये रोख दाखविण्यात आले आहेत.पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे ८९ हजार ६७९ रुपये रोख असल्याचे नमुद केले आहे.

पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे २८ कोटी ९२ लाख ५९ हजार ३३६ रुपयांची स्थावर मालमत्ता, तर ३६ कोटी १६ लाख ४३ हजार ४५३ रुपयांची जंगम मालमत्ता असून,त्यामध्ये ३३ कोटी ७९ लाखांचे रोखे आणि समभागांचा समावेश आहे. एवढी संपत्ती असली तरी एकूण ११ कोटी ४४ लाख ३३ हजार १०९ रुपये ठाकरे यांना देणी आहेत.

रायगड जिल्ह्यातील भिलवले येथे शेतजमीन असून, त्याचे सध्याचे बाजारमूल्य ५ कोटी ६ लाख रुपये आहे.तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मुरशेत आणि मुंबईत माहीममध्ये जागा असल्याचे नमुद केले आहे. कलानगर मधील मातोश्री आणि दुस-या एका अशा दोन बंगल्यांची किंमत ३३ कोटी ७३ लाख ६० हजार २३८ दाखवली आहे.

असे असले तरी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर एचडीएफसी बँकेच्या ओव्हरड्राफ्टचे सुमारे चार कोटी ६ लाख रुपयांची देणी आहेत.असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.हिंदू अविभक्त कुटुंब खात्यात ५३ लाख ४८ हजारांचे दागदागिने असल्याचे नमुद केले आहे. रोखे आणि समभागांमध्ये २१ कोटी ६८ लाख ५१ हजार १ रुपयांची गुंतवणूक आहे.तीन लाखांचा एलआयसी विमा आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर २३ गुन्हे दाखल असून,इतर गु्न्ह्य़ांत दोषारोपपत्र वा दोषी सिद्ध झालेले नाहीत.मुख्यमंत्री ठाकरे यांची वेतन,व्याज,लाभांश,भांडवली नफा ही उत्पन्नाची साधने आहेत.