उच्च प्रतीच्या बियाणांचा पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे – वर्षाताई गायकवाड

0
115

उच्च प्रतीच्या बियाणांचा पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे – वर्षाताई गायकवाड

सुरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्युज : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रधुर्भावामुळे सर्वत्र देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र या परिस्थितीत शेती व शेतीसाठी लागणारी अवजारे आणि बी- बियाणे यांना सूट देण्यात आलेली आहे. यातच कॅबिनेट मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सवांद साधला होता.

यावेळी यावेळी खासदार राजीव सातव, खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, चंद्रकांत नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद पोहरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे आदी व्हिडिओ कॉन्फरेंच्या माध्यमातून हजेरी लावली होती.

यावेळी पालकमंत्री म्हणाल्या की, खरीप हंगाम-२०२० करिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून बियाणांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रारी प्राप्त होवू नये, याची कृषी विभागाने आधीकची दक्षता घ्यावी. तसेच बियाणांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांची तक्रार येवू नये याकरीता आतापासूनच उपाययोजना कराव्यात.

जिल्ह्यातील एकुण लागवडी लायक क्षेत्रापैकी तीन लाखाच्या वर हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. खरीप पिकामध्ये प्रामुख्याने सोयाबीन २,५५,४०० हेक्टर, तूर ५२,५०० हेक्टर, कापूस ४५,००० हेक्टर एवढ्या क्षेत्रावर प्रमुख पिकांच्या पेरणीचे नियोजन करणे अपेक्षित आहे अशी माहिती वर्षाताई गायकवाड यांनी दिली आहे.