आरोग्य सेवेचा कोर्स झालाय पण नोकरी नाही? आज महाराष्ट्राला तुमची गरज – मुख्यमंत्री ठाकरे

0
38

मुंबई । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सध्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ हजार पार गेली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य सेवासंबंधी कोर्स झालेल्यांची आज महाराष्ट्राला गरज असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही याआधी आरोग्य सेवेत होता मात्र आता निवृत्त झाला आहात, किंवा रिक्त पदे नसल्याने तुमच्याकडे नोकरी न्हवती तर आता अशांनी आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.

जे भारतीय सैन्याच्या आरोग्य विभागात होते आणि आता निवृत्त झाले आहेत अशांना देखील ठाकरेंनी आवाहन केले आहे. आज राज्यावर मोठे संकट आले असून आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची राज्याला आवश्यकता आहे. तेव्हा ज्यांचे आरोग्य सेवेसंबंधी शिक्षण झाले आहे मात्र नोकरी नाही किंवा नोकरीतून निवृत्ती झाली आहे अशांची आज महाराष्ट्राला गरज आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

दरम्यान, कोरोनाविरुद्धचे युद्ध आपण जिंकणार आहोत असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मात्र तुम्ही सर्वजण घरीच राहा असं आवाहन देखील ठाकरे यांनी केले आहे. तसेच ज्यांना आरोग्य सेवेत काम करण्याची इच्छा आहे अशांनी या मेल आयडीवर आपले नाव, पत्ता आणि संपर्क आम्हाला कळवावा असं ठाकरे यांनी सांगितले आहे.