आरक्षणासाठी लढा का महत्वाचा होता हे कालच्या निकालाने सिद्ध झाले – छत्रपती संभाजीराजे
ग्लोबल न्यूज: गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्याने शिक्षणात आणि नोकरीत संधी नाही. गुणवत्ता असूनही फक्त आरक्षणा अभावी शिक्षणात आणि नोकरीत संधी नसल्याने राज्यातील मराठा समाज विवंचनेत अडकला होता. राज्यातील मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा, लाख मराठा’ची हाक देऊन मूक मोर्चाला सुरुवात केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत मराठा समाजाने तब्बल 128 जण आरक्षणाचा लाभ घेऊन अधिकारी झाले आहेत. क मराठा, लाख मराठा’ हाक ठरली भारी, समाजातील 128 जण झाले अधिकारी असेच सुखद चित्र आज राज्यभर दिसत आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्यासाठी धाडसी पाऊल उचलले. त्यांच्या सरकारने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास या प्रवर्गात नोकरीसाठी 12 टक्के व शिक्षणासाठी 13 टक्के आरक्षण दिले. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पहिलीच जाहिरात 2019 मध्ये आली होती.

जाहिरातीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. आरक्षणाचा लाभ घेऊन मराठा समाजातील विद्यार्थी/विद्यार्थिनी अधिकारी झाल्याची पहिलीच घटना शुक्रवारी घडल्याने आरक्षणासाठी केलेल्या संघर्षाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.

दरम्यान मराठा समाजातील युवकांच्या या उत्तुंग यशाबद्दल खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या भावना व्यक्त करत मराठा आरक्षणाची काय गरज होती हे अधोरेखीत केलं आहे. एमपीएससी परीक्षेतुन निवड झालेल्या सर्व भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन. मराठा समाजातील मुलांची संख्या बघून समाधान वाटलं.
आरक्षणासाठीचा लढा उभारणं का गरजेचं होतं, हे कालच्या निकालाने सिद्ध झालं. माझे सर्व समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांना आवाहन आहे, की येणाऱ्या काळात महाराष्ट्रापुढे अभूतपूर्व आव्हाने उभे राहतील, त्या आव्हानांना सक्षमपणे तोंड देण्याकरिता प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही स्वतः सिद्ध व्हाल, आणि महाराष्ट्राच्या उत्कर्षात सर्वोच्च योगदान द्याल ही अपेक्षा. आशा भावना संभाजी राजे यांनी व्यक्त केल्या आहेत.