आम्ही डोमकावळे तर तुम्ही लबाड लांडगे का ? वाचा कोणी केली टीका

0
125

आम्ही डोमकावळे तर तुम्ही लबाड लांडगे का ? वाचा कोणी केली टीका

सुरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्यूज: भाजपने आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र बचाओ आंदोलन करणार आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात हे राज्य सरकार निष्क्रिय ठरलं असून या सरकारला आता जाग आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनतेने आपल्या घराच्या अंगणात उभं राहुन सरकारच्या निष्क्रियते विरोधात काळे झेंडे, कोणत्याही काळ्या वस्त्राने निषेध व्यक्त करावा, असे भाजपकडून करण्यात आले आहे. यावर शिवसनेने आपल्या ‘सामना’ या मुखपत्रातून चांगलाचं समाचार घेतला आहे.

कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र प्रकाशमान, तेजस्वी करण्याचे युद्ध सुरू असताना राज्य ‘काळे’ करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल. असाच टोला शिवसेनेने लगावला होता. यावर आता भाजप आ. आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही डोमकावळे तर तुम्ही लबाड लांडगे का ? असा पलटवार आशिष शेलार यांनी केला आहे.

आपल्या अधिकृत ट्विटरवरून आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. दुसऱ्याच्या घरात रोज डोकावणाऱ्या पत्रपंडितांनी भाजपच्या आंदोलनावर भाष्य केले नसते तर आम्हालाच चुकल्यासारखे वाटले असते. आम्ही डोमकावळे तर तुम्ही कोण? लबाड लांडगे? सत्तेची फळं खायची आणि त्याच झाडाची मुळं खणायची ! त्यांची अशीच गत व्हायची! आता बोलून नाही, महाराष्ट्रात करुन दाखवा ! असा टोला शेलार यांनी लगावला आहे.