आमदार रोहित पवार यांनी सोनू सुदच्या घरी जाऊन केले त्यांचं कौतुक; वाचा सविस्तर-

0
71

आमदार रोहित पवार यांनी सोनू सुदच्या घरी जाऊन केले त्यांचं कौतुक; वाचा सविस्तर-

ग्लोबल न्युज: कोरोनाच्या काळात परप्रांतीय मजुरांना आपआपल्या जिल्ह्यात पोहचवण्यासाठी मदत करणाऱ्या अभिनेता (रिअल लाईफ हिरो) सोनू सुद यांच्या भेटीला आमदार रोहित पवार त्यांच्या घरी पोहचले होते. आज सोनू सूद यांच्या कामाचे सर्व स्थरातून कौतुक होताना दिसत आहे तसेच राजकीय वर्तुळात देखील सूद यांच्या कामाची चर्चा होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केवळ कौतुक न करता थेट सोनूच्या घरी जाऊन त्याची भेट घेऊन कौतुक केले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

करोना विषाणूचा संसर्ग मार्च महिन्याच्या शेवटी देशात संपूर्ण लॉकडाऊन पुकारण्यात आला. सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक सुविधा बंद करण्यात आल्या. अत्यावश्यक सेवा वगळता प्रत्येक गोष्टीवर बंदी घातली गेली. अचानक पुकारण्यात आलेल्या या लॉकडाऊनमुळे मुंबईसह महाराष्ट्रात लाखो मजकूर अडकून पडले.

हाताला काम नाही आणि राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे कामगारांना गावाकडं जाण्याचे वेध लागले. दीड महिने हाल सोसल्यानंतर अखेर त्यांना आपापल्या गावाकडं जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, ती पुरेशी नव्हती.

राज्य सरकार आपल्या परीनं मजुरांना सुखरूप सोडण्याचा प्रयत्न करत होते. या प्रयत्नांना बळ देण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था व मान्यवर पुढं आले. अभिनेता सोनू सूद हा त्यांच्यापैकीच एक होता. लॉकडाऊनमध्ये त्यानं हजारो मजुरांसाठी बसची व्यवस्था करून दिली आणि त्यांना सुखरूप घरी पोहोचण्यास मदत केली.