आमदार नितेश राणे म्हणतात..राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे उद्रेक निश्चित

0
116

आमदार नितेश राणे म्हणतात..राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे उद्रेक निश्चित

सुरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्युज: भारतात आज करोना विषाणूचा विळखा घट्ट बसलेला आहे. महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये अजुनही करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टींची दुकानं व व्यवसाय लॉकडाउन काळात बंद आहेत.

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना राज्य सरकार व स्थानिक पोलीस प्रशासन E-Pass पुरवत आहे. मात्र E-Pass देताना सरकारी यंत्रणांमध्ये कोणतेही नियोजन नसल्याचा दावा करत भाजपा आमदार नितेश राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर टिका केली आहे.

E-Pass च्या आधारावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात आरोग्य आणि क्वारंटाइन सुविधा ही मर्यादीत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास त्यांना उपचारासाठी कोल्हापूर किंवा गोव्याला पाठवावं लागत आहे.

यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी मिळाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला सिंधुदुर्गात प्रवेश करण्यासाठी पास देऊ नका अशा आशायचं पत्र जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सर्व महत्वाच्या शहरांतील पोलीस आयुक्तांना लिहंल आहे.