आमदार आंबदास दानवे यांनी या दोन अधिकाऱ्यांचा केला कोविड योद्धा म्हणून गौरव
ग्लोबल न्यूज : सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संकटात पुढे येऊन सेवा बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


आज शिवसेना नेते, राज्याचे पर्यावरण-पर्यटन, राज्यशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद या कोविड योद्ध्याना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावतीने सन्मानपत्र शिवसेना जिल्हाप्रमुख तथा विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांच्याहस्ते देण्यात आले.
कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले असून कोविड योध्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे असे आवाहन केले आहे.यावेळी उप जिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, विधानसभा संघटक राजु वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे यांची उपस्थिती होती.