आनंदयात्री प्रतिष्ठान ने उचलला भगवंत अन्नछत्र चा खर्च

0
64

आनंदयात्री प्रतिष्ठान  ने उचलला  भगवंत अन्नछत्र चा  खर्च 

बार्शी :  आनंदयात्री प्रतिष्ठान बार्शी या सामाजिक संस्थेच्या वतीने 15 एप्रिल पासून 3 मे पर्यंत चा भगवंत अन्नछत्र संस्था च्या वतीने चालणाऱ्या संपूर्ण अन्नछत्र चा खर्च उचलण्यात आला आज बुधवार पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात खर्चापोटी पावनेदोन लाख रुपये देण्यात आले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


सध्या संपूर्ण देशासह राज्यभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी सह लॉक डाऊन सुरू आहे. या मुळे बार्शीतील अनेक उद्योगधंदे आणि बाजारपेठ बंद आहे. रोजची कमाई करून आपली उपजीविका भागवणारे गोर गरीब कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. हातावर पोट असणारे लोकांचं जगणं मुश्किल झालं आहे. त्यात अश्या लोकांची दोन वेळची भूख भागवण्याचे काम बार्शी येथील भगवंत मंदिर येथील भगवंत अन्नछत्रालय करीत आहे.

आज बार्शीतील  नगर परिषद विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेले आनंदयात्री प्रतिष्ठाण या सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनेने  पावणे दोन लाख रुपयांची मदत आज केली आहे. ही मदत बार्शी शहर पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या हस्ते अन्नछत्राचे संचालक अरुण माने यांच्या कडे सुपूर्द केली.

यावेळी नागेश अक्कलकोटे, ज्योतिर्लिंग (बप्पा) कसबे, आण्णा पेठकर ,पंकज शिंदे ,शितल जानराव,  विक्रमसिंह पवार,ऋषिकांत पाटील ,रामचंद्र इकारे ,रोनक पल्लोड ,शशिकांत दसंगे ,प्रवीण थळकरी ,राजा पाटील ,रुपेश बंगाळे, आनंद तोडकरी ,प्रशांत घोडके  ,विजय पाचपुते ,सागर पवार ,संतोष उदाने ,अजीज मोगल ,गोपाळ साखरे ,जालिंदर देवकर ,विकास गुळमिरे ,आदी उपस्थित होते 

कृष्णा उपळकर यांनी आभार मानले