आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आमदार आंबदास दानवे यांचा आगळावेगळा उपक्रम वाचा
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते. मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते.

मात्र शिवसेना संभाजीनगर येथे आमदार तथा जिल्हाप्रमुख आंबदास दानवे यांच्या मार्फत मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची आता सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. तसेच या उपक्रमाचे सर्व स्थरावर कौतुक सुद्धा होताना दिसत आहे

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवळाना,जळगाव घाट,जेहुर,मोहरा ता कन्नड येथील शेतकऱ्यांना कपाशी, बाजरी,मका यांची बियाणे आमदार तथा जिल्हा प्रमुख आंबदास दानवे यांच्या मार्फत मोफत वाटप करण्यात आले होते.

काही दिवसातच राज्यात सर्वत्र दमदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे मात्र दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमूळे पुरेसे पैसे नसल्यामुळे आज बी बियाणे घेणे शुद्ध शेतकऱ्यांना जड जात आहे त्यातच आमदार दानवे यांनी पेरणीच्या मोसमात दिलेला मदतीचा हात शेतकऱ्यांना बळ देणारा ठरलेला आहे.