आजपासून तुळजाभवानी देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद, चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द

    0
    23

    कोरोनाचा वाढता धोकापाहता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे.

    कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे 5 वाजल्यापासून मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे.

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    तुळजाभवानी मंदिर संस्थानने निर्णय जाहीर करताना देवीच्या धार्मिक पूजा आणि विधी हे देवीचे महंत आणि पाळीकर पुजारी हे करतील. मात्र, 4 पेक्षा जास्त पुजारी उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे.

    देवीची चरण तीर्थ, प्रक्षाळ पूजा आणि अभिषेक पूजा या भक्तांसाठी बंद असतील असे तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष दिपा मुंडे मुधोळ यांचे पुढील आदेश येईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे.

    तुळजाभवानी देवीची 5 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान होणारी चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे . तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आंध्रप्रदेशसह देशभरातील भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, कोरोनामुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याने भाविकांनी तुळजापूर येथे दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन मंदिर संस्थानच्या अध्यक्ष दिपा मुंडे यांनी केले आहे.