आघाडीत बिघाड होण्याची शक्यता, कॉंग्रेसची महत्वपूर्ण बैठक
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर पुन्हा एकदा समोर आलं आहे. काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी असल्याने काँग्रेसच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. सरकारमध्ये काय भूमिका घ्यायची याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

मंत्री सुनील केदार यांच्या निवासस्थानी काँग्रेस मंत्र्यांची ही महत्वपूर्ण बैठक होणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. यावेळी राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना कोरोना संकटकाळात काँग्रेस महाविकास आघाडीसोबतच आहे असं आश्वासन दिलं आहे.

राहुल गांधी यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे पण आम्ही डिसिजन मेकर नाही असं विधान केलं होतं. या विधानानंतर राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र निर्माण झालं. विरोधी पक्षानेही राज्य सरकारवर आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा लावला. राज्यात महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल आहे असं चित्र दिसत नाही, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
ज्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली त्याचदिवशी शरद पवार मातोश्रीला जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या भेटीत कोरोनावर चर्चा झाल्याचं संजय राऊत सांगत असले तरी राज्य सरकारला स्थिर असल्याचं वारंवार बोलत आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर आजची बैठक अतिशय महत्वाची मानली जात आहे.