अशी आहे ऋषी-नीतू यांची लव्हस्टोरी; वाचा सविस्तर-

0
139

बॉलिवूडमध्ये चिंटू नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते ऋषी कपूर यांचं आज (३० एप्रिल रोजी) निधन झालं. वयाच्या ६७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एचएन रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात त्यंचं निधन झालं. अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं आहे.

चॉकलेट बॉय अभिनेता ऋषी कपूर यांचा जन्म राज कपूर यांच्या घरात झाला होता. लहानपणापासूनत ते खूप हँडसम होते आणि तरुणी त्यांच्या प्रेमात पडत असत. ऋषी कपूर हे आपल्या वडिलांसोबत सिनेमांच्या सेटवर जात असत. अभिनयाचा गुण त्यांना वडिलोपार्जितच मिळाला होता. त्यामुळेच त्यांनी वयाच्या १८व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

१९७४ मध्ये अभिनेते ऋषी कपूर हे पहिल्यांदा नितू सिंह यांना भेटले. दोघेही ‘जहरीला इन्सान’ सिनेमाच्या सेटवर एकत्र भेटले होते. यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. दोघांचीही अशी मैत्री झाली की ते एकमेकांसोबत चांगली मजा-मस्ती करत असत. त्यावेळी नितू यांचं वय अवघे १४ वर्षे होतं. याच दरम्यान ऋषी कपूर यांना नितू यांच्यासोबत प्रेम झालं. त्याच काळात ऋषी कपूर यांचा गर्लफ्रेंडसोबत वाद झाला होता आणि तिची मनधरणी करण्यासाठी नितू यांच्याकडूनच ऋषी कपूर यांनी टेलिग्राम लिहून घेतलं होतं.

ऋषी कपूर यांच्या कठीण काळात नीतू कपूर यांच्यासोबत सावलीसारख्या उभ्या होत्या. ऋषी कपूर आणि नीतू कपूर मोस्ट आयकॉनिक ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन कपल्ममधील एक होते. लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही त्यांची केमिस्ट्री तशीच होती. ऋषी कपूर प्रत्येक गोष्टींवर नीतू कपूर यांची स्तुती करायचे.

हळूहळू ऋषी कपूर हे आपल्या गर्लफ्रेंडला विसरु लागले आणि नितू यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. नितू आपल्यासाठी परफेक्ट असल्याचं ऋषी कपूर यांना जाणवलं. सिनेमाच्या सेटवर ऋषी कपूर हे नितू यांना खूपच त्रासही देत असत. त्यांच्या चेहऱ्यावर काजळ लावत. ‘जहरीला इन्सान’ सिनेमानंतर ऋषी कपूर युरोपला गेले आणि तेव्हा ते नितू यांना टेलिग्राम लिहत असत. ज्यावेळी ऋषी कपूर पुन्हा भारतात परतले तेव्हा त्यांनी नितू यांच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त केलं. 

ऋषी कपूर आणि नितू यांचं एकमेकांसोबत राहणं आणि जवळ येणं हे नितू यांच्या आईला पसंत नव्हतं. बॉलिवूडमधील चर्चांपासून नितू यांना दूर ठेवण्याचा त्यांच्या आईची ईच्छा होती. ज्यावेळी ऋषी आणि नितू हे डेटवर जात होते त्यावेळी नितूची आई त्यांच्यासोबत कोणालातरी पाठवत असे. ज्यावेळी ऋषी कपूरने नितूला लग्नासाठी विचारणा केली तेव्हा नितू यांच्या आई खूपच खूष झाल्या. ११ जानेवारी १९८० रोजी ऋषी कपूर आणि नितू विवाहबंधनात अडकले.