अयोध्येत राम मंदिरासाठी सपाटीकरण, कामादरम्यान सापडले प्राचीन शिवलिंग आणि मुर्ती

0
144

अयोध्येत राम मंदिर निर्माणाचे काम सुरू झाले आहे. राम जन्मभूमी परिसरात सपाटीकरणादरम्यान पुरातन मुर्ती, स्तंभ आणि शिवलिंग सापडले आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महामंत्री चम्पत राय म्हणाले की ढिगारा हटवल्यानंतर अनेक मुर्त्या आणि एक मोठे शिवलिंग सापडले आहे.

राम मंदिर निर्माणासाठी गठीत केलेल्या विश्वस्तांनी दिलेल्या माहितीनुसार सपाटीकरणानंतर अनेक पुरातन वस्तू इथे आढळल्या आहेत. त्यात देवी देवतांच्या खंडित मुर्त्या, पुष्प, कलश सारख्या कलाकृती सापडल्या आहेत. तसेच अनेक स्तंभ आणि एक पाच फुट आकाराचे मोठे शिवलिंग सापडले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

11मे पासून राम जन्मभूमी परिसरात सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टसिंग राखत जेसीबी, क्रेन आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने 10 मजूर हे सपाटीकरणाचे काम करत आहेत. परिसराचे सपाटीकरण झाल्यानंतर राम मंदिर निर्माणाचे काम सुरू होईल. अयोध्यत लवकरच राम मंदिर विश्वस्ताचे कार्यालय सुरू होणार आहे. राम जन्मभूमी परिसरातच राम कचहरी मंदिरात विश्वस्ताच्या कार्यालयाचे काम पूर्ण झाले आहे.