अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही, जगभरात कोरोनाची परिस्थिती बिघडते आहे – WHO

0
288

लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोनाचा प्रसार होतो का? WHO चा नवा खुलासा

अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही, जगभरात कोरोनाची परिस्थिती बिघडते आहे – WHO

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

जिनिव्हा : जगभरात कोरोनाचा प्रसार थांबता थांबत नाही आहे. यातच काही देशांनी लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात केली आहे तर, काही देशांमध्ये निर्बंध कायम आहेत. मात्र सर्वांना चिंता होती ती, लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांची. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization-WHO) एक चांगली बातमी दिली आहे.

WHOच्या म्हणण्यानुसार Asymptomatic म्हणजेच लक्षण नसलेल्या रुग्णांपासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका कमी आहे. WHOच्या एपिडेमिओलॉजिस्ट मारिया वॅनकर्खोव्ह यांनी सांगितले की, बर्‍याच देशांमध्ये कोरोनाचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. निम्म्याहून अधिक एसिंम्प्टोमॅटिक प्रकरणे नवीन प्रकरणांमध्ये आढळून येत आहेत, परंतु या संक्रमित रुग्णांकडून संसर्ग होण्याची धोका कमी आहे.

WHO कडून आलेले हे विधान आधी आलेल्या बातम्यांपेक्षा वेगळे आहे. जेव्हा मार्च आणि एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या देशांमध्ये एसिंम्प्टोमॅटिक रुग्णांची संख्या वाढली होती, तेव्हा असे मानले जाते की अशा संसर्गांमुळे Covid-19 झपाट्यानं पसरत आहे.

????एसिंम्प्टोमॅटिक रुग्णांचा चीननं कोरोना यादीत नव्हता केला समावेश

एसिंम्प्टोमॅटिक रुग्णांवरून चीनवरही टीका केली जात आहे. कारण चीननं सुरुवातीच्या काळात वुहानमधील एसिंम्प्टोमॅटिक रुग्णांना कोरोना यादीमध्ये सामिल केले नाही. नंतर या लोकांचा समावेश करण्यासाठी चीनने आणखी एक यादी जाहीर केली. परंतु आता WHOच्या निवेदनात असे स्पष्ट झाले आहे की लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची फारच कमी प्रकरणे आहेत.

विशेष म्हणजे कोरोना साथीच्या संदर्भात WHOच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर थेट हल्ला केला होता. WHO चीनच्या प्रभावाखाली काम करत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. अमेरिकेने WHOला मोठ्या प्रमाणात निधी देण्यासदेखील बंदी घातली आहे. मात्र, अमेरिकेने हे निधी बंद केल्याचे सांगितल्यानंतर काही दिवसांनंतर चीनने WHOला मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे आश्वासन दिले.

WHO कडून आलेले हे विधान आधी आलेल्या बातम्यांपेक्षा वेगळे आहे. जेव्हा मार्च आणि एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या देशांमध्ये एसिंम्प्टोमॅटिक रुग्णांची संख्या वाढली होती, तेव्हा असे मानले जाते की अशा संसर्गांमुळे Covid-19 झपाट्यानं पसरत आहे.

दरम्यान, एकीकडे अनेक देश लॉकडाउन शिथील करत असताना जागतिक आरोग्य संघटनेने मात्र जगभरात करोनाची परिस्थिती बिघडत चालली असल्याचं म्हटलं आहे. आपण यासंबंधी इशारा दिला होता असंही त्यांनी सांगितलं आहे. सोमवारी सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

अमेरिकेत सध्या कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूवरुन आंदोलनं सुरु असून जागतिक आरोग्य संघटनेने आंदोलनकर्त्यांना सुरक्षेची सर्व काळजी घ्या असा सल्ला दिला आहे. AFP ने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

????साभार : NEWS18 लोकमत????