अजितदादा म्हणतात गोपीनाथ मुंडे म्हणजे संघर्षशील लोकनेते व दिलदार…

0
151

आज भाजपचे ज्येष्ठ नेते कै. गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने आज भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना आदी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सोशल मीडियावर मुडे साहेबांना आदरांजली वाहून त्यांच्या कार्याचे कौतुक करत उजाळा दिला व आठवणी जाग्या केल्या. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंडे यांचे स्मरण करताना अप्रत्यक्षपणे राजकीय चिमटा विद्यमान विरोधी पक्षनेते याना काढला आहे.

अजितदादांची पोस्ट

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी ऊसतोडणी मजुरांसाठी जीवनभर संघर्ष करणारे माजी उपमुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! त्यांच्या रूपानं महाराष्ट्राला संघर्षशील लोकनेता, दिलदार विरोधी पक्षनेता लाभला.

सत्तेत किंवा विरोधी पक्षात असताना त्यांनी नेहमी राज्याच्या हिताची भूमिका घेतली. आज, महाराष्ट्र ‘कोरोना’ संकटाशी लढत असताना त्यांची उणीव निश्चित भासत आहे. कष्टकरी, सामान्य जनतेसाठी त्यांनी दिलेलं योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. संघर्ष नायकाला विनम्र अभिवादन!