अखेर WhatsApp ची ‘ही’ सर्व्हिस होणार लॉन्च.

0
128

अखेर WhatsApp ची ‘ही’ सर्व्हिस होणार लॉन्च.

फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपच्या WhatsApp Pay या सेवेची भारतात दोन वर्षांपासून प्रतीक्षा आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

WhatsApp ने भारतात दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१८ मध्ये या पेमेंट सेवेला बिटा टेस्टिंगच्या रुपात जारी केले, तेव्हापासून चर्चेत असलेल्या या सेवेला अद्यापही सुरूवात झालेली नाही. मात्र, आता ही सेवा लवकरच सुरू होणार आहे.

मे महिन्याच्या अखेरपर्यंत WhatsApp Pay ही सेवा भारतात सुरू होईल असं समजतंय. Money Control च्या वृत्तानुसार, मे महिन्याच्या अखेरपर्यंत कंपनी WhatsApp Pay ही सेवा अधिकृतपणे लॉन्च करेल. पहिल्या टप्प्यामध्ये आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक या WhatsApp Pay सेवेचा हिस्सा असतील.

एसबीआय मात्र पहिल्या टप्प्यात यामध्ये सहभागी नसेल, पण नंतरच्या टप्प्यामध्ये मात्र एसबीआयचाही समावेश केला जाईल.