अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या निर्णयाबाबत सरकारने ठेवले दोन पर्याय वाचा …!

0
289

अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या निर्णयाबाबत सरकारने ठेवले दोन पर्याय वाचा …….!

ग्लोबल न्यूज : राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा होतील का, याबाबत विध्यार्थी आणि पालकांमध्ये असलेला संभ्रम आज दूर झाला आहे. विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंबंधात सरकार अनुकूल असून या परीक्षांचे वेळापत्रक मात्र नंतर जाहीर केलं जाणार आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोरोनाच्या वाढत्या प्रधुर्भावामुळे पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकार दोन पर्यायांचा विचार करत आहे. यात पहिला पर्याय परीक्षा देण्याचा तर दुसरा पर्याय परीक्षा न देण्याचाही ठेवण्याबाबत सरकार विचार करत आहे. पण दुसऱ्या पर्यायासाठी सरकार तज्ज्ञांकडून कायदेशीर सल्ला घेण्याचा विचार करत आहे.

ज्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी परीक्षा देऊन चांगले मार्क मिळवायचे आहेत, त्यांना परीक्षा देण्याचा पर्याय खुला असेल. ज्यांना परीक्षा द्यायची नाही आणि उत्तीर्णचं प्रमाणपत्र मिळवायचं आहे, त्यांच्यासाठी दुसऱ्या पर्यायाचा सरकार विचार करत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची नसेल, तर त्यांना त्यांच्या मागील परीक्षांच्या मार्कांच्या सरासरीवरून श्रेणी पद्धतीने निकाल दिला जाईल, पण यासाठी सरकार कायदेशीर सल्ला घेणार आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur