बार्शी तालुक्यातील झेडपी – पंचायत समितीचे गट अन गणाची रचना जाहीर
वाचा कोणते गाव आहे कोणत्या गणात
बार्शी : बार्शी तालुक्यातील जि.प.गट व पंचायत समिती गणांची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली असून वैराग येथे नगरपंचायत झाल्याने वैराग जि.प.गट व पंचायत समिती गण कमी झाला असला तरी नव्याने केलेल्या प्रभाग रचनेत शेळगांव हा नवीन जि.प.गट तर मानेगांव हा नवीन पंचायत समिती गण तयार केला आहे. तसेच कारी हे गांव उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ठ झाल्याने कारी ऐवजी खामगांव हा नवीन पंचायत समिती गण अस्तित्वात आला आहे. जिल्ह्यात नवीन अकरा गट वाढले असल्याने बार्शी तालुक्यात एखादा गट वाढेल असा अंदाज होता. मात्र कारी अन वैराग कमी झाल्याने गटाची व गणांची संख्या पूर्वीइतकीच म्हणजे अनुक्रमे ६ व १२ अशीच राहिली आहे.

जि.प.गटातील लोकसंख्येचा विचार केला तर जास्तीत जास्त ४२२०९ तर कमीत कमी ३४५३३ इतकी लोकसंख्या आहे. एका जि.प.गटात सरासरी ३८३७१ इतकी लोकसंख्या आहे. तर पंचायत समिती गणांमध्ये जास्तीत जास्त २११०४ तर कमीत कमी १७२६७ इतकी लोकसंख्या आहे. एका गणात सरासरी १९१८५ इतकी लोकसंख्या आहे.
जि.प.गट (कंसात त्यामध्ये समाविष्ठ असलेले गण ) :
१) उपळाई ठों (उपळाई ठों, आगळगांव), २) पांगरी (पांगरी, खामगांव),
३) उपळे दु (उपळे दु, गौडगांव),
४) पानगांव (पानगांव, बावी),
५) मालवंडी (मालवंडी, सासुरे),
६) शेळगांव आर (शेळगांव आर, मानेगाव)
पंचायत समिती गण व त्यामध्ये समाविष्ठ असलेली गावे :
१) उपळाई ठों : उपळाई ठों, पिंपळगांव धस, देवगांव, नागोबाचीवाडी, लक्ष्याचीवाडी, कांदलगांव, ताडसौंदणे, गाताचीवाडी, फपाळवाडी, शेलगांव व्हळे, गाडेगांव, खडकलगांव, बेलगांव, भोयरे
२) आगळगांव : आगळगांव, बाभुळगांव, जामगांव आ., उंबरगे, चुंब, मांडेगांव, कुसळंब, कोरेगांव, कळंबवाडी आ. खडकोणी, अरणगांव, भानसळे, वानेवाडी
३) पांगरी : पांगरी, चारे, काटेगांव, शिराळे, बोरगांव खु, पिंपळवाडी, पाथरी, वालवड, धामणगांव आ, धानोरे
४) खामगांव : खामगांव, उक्कडगांव, वाघाचीवाडी, धोत्रे, चिंचोली, ढेंबरेवाडी, ममदापूर, पांढरी, घोळवेवाडी, पिंपळगांव, जहानपूर, गोरमाळे, येळंब, पुरी, घारी
५) उपळे दु : उपळे दु, चिखर्डे, नारी, नारीवाडी, इंदापूर, सावरगांव, कापशी, पिंपरी आर, जामगांव पा,
६) गौडगांव : गौडगांव, तांबेवाडी /लमाणतांडा, भातंबरे, बोरगांव झा, झाडी, झरेगांव, निंबळक, रूई, भालगांव, संगमनेर, रऊळगांव, आळजापूर, मिर्झनपूर
७) बावी : बावी, तावडी, शेळगांव मा, तांदुळवाडी, सौंदरे, महागांव, मळेगांव, पिंपळगांव पान, दडशिंगे,
८) पानगांव : पानगांव, कोरफळे, कव्हे, कासारवाडी, बळेवाडी, खांडवी, गोडसेवाडी, अलिपूर,
९) मालवंडी : मालवंडी, वांगरवाडी ,शेंद्री, भोईंजे, श्रीपतपिंपरी, तुर्कपिंपरी, गुळपोळी, सुर्डी,

१०) सासुरे : सासुरे, दहिटणे, मुंगशी वा, तडवळे, यावली, ढोराळे, उंडेगाव, रस्तापूर, काळेगांव, इर्ले, इर्लेवाडी, तुळशीदासनगर,
११) मानेगांव : मानेगाव, रातंजन, हळदुगे, लाडोळे, नांदणी, पिंपरी पान, घाणेगांव, हिंगणी पान, मालेगांव, मुंगशी आर,
१२) शेळगांव आर : शेळगांव आर, धामणगांव दु, हत्तीज, चिंचखोपन, हिंगणी आर, ज्योतीबाचीवाडी, अंबाबाईचीवाडी, सारोळे, कासारी, भांडेगांव, अांबेगांव, राळेरास, सर्जापूर या गावांचा समावेश आहे.
चौकट
ठळक वैशिष्ट्य
आगळगाव गणातील धानोरे पांगरी गणात गेले. पांगरी गणातील घारी व पुरी नव्याने झालेल्या खामगाव गणात गेले आहे.
उपळे दु गणातील तांबेवाडी/लमाण तांडा व भातंबरे हे गौडगाव गणात गेले आहेत.
गौडगाव मधील आंबेगाव, भांडेगाव, सारोळे, कासारी ही गावे शेळगाव आर मध्ये गेली.
बावीतील पिंपरी व हिंगणी गावे मानेगाव गणात गेली आहेत.
पानगाव गणातील दडशिंगे व कळंबवाडी बावी मध्ये गेली. मालवंडीतील उंडेगाव व रस्तापूर सासुरे गणात गेले.
सासुरेतील मानेगावचा नवीन गण झाला व राळेरास शेळगाव गणात गेले
उडालेल्या वैराग गणातील तुळशीदासनगर हे सासुरे गणात गेले.
शेळगाव गणातील रातंजन, मालेगाव, हळदुगे, नांदणी, लाडोळे, मुंगशी आर ही गावे गणात गेली आहेत.
असा तयार झाला नवीन मानेगाव गण
जुन्या सासुरे गणातील मानेगाव, शेळगाव गणातील रातंजन हळदुगे, लाडोळे, नांदणी, मुंगशी आर, मालेगाव तर बावी गणातील पिंपरी पा, घाणेगाव, हिंगणी पा तीन गणातील १० गावे काढून नवीन मानेगाव गण शेळगाव आर जिल्हा परिषद गटात तयार करण्यात आला आहे.