चिंताजनक: बार्शी तालुक्यात ५२ कोरोना रुग्णाची वाढ तर एक मृत्यू ; वाचा सविस्तर रुग्ण कोणत्या भागातील

0
982

चिंताजनक: बार्शी तालुक्यात ५२ कोरोना रुग्णाची वाढ तर एक मृत्यू ; वाचा सविस्तर रुग्ण कोणत्या भागातील

बार्शी : शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन आज दि. ११ ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालात बार्शी तालुक्यात ५२ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर एक मयतची नोंद झाली आहे .

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोरोनाला आळा घालण्यासाठी बार्शीत केलेला लॉकडाऊन उठवुन १० दिवस उलटले आहे. बार्शी बाजार पेठेत उसळलेली गर्दी, नागरीक सोशल डिस्टंस तसेच कोरोना संदर्भात नियमाचे पालन होत नसल्याने रुग्ण वाढ सुरुच आहे.

आज आलेल्या अहवालात बार्शी तालुक्यात ४३५ जणांचे अहवाल प्राप्त झाले . यात बार्शी शहरातील २८५ अहवाल प्राप्त अहवालापैकी २५६ अहवाल निगेटिव्ह आले. तर बारबोले प्लॉट १, तुळजापुर रोड १, झाडबुके मैदान ४, दत्त नगर १, जैन मंदीर कुर्डूवाडी रोड १, सुलाखे हायस्कुल रोड २,

गाडेगाव रोड ३, कापसे बोळ १, कोष्टे गल्ली ३, सिद्धार्थ नगर २, भीमनगर ४, देशमुख प्लॉट १, बारंगुळे प्लॉट १, रोडगा रस्ता १, चाटे गल्ली १, खुरपे बोळ १, वाणी प्लॉट १ असे २९ कोरोना बाधित रुग्ण शहरात आढळले आहे यामुळे शहरातील बाधित रुग्णांची संख्या ७८६ पोहचली आहे .

तर ग्रामिण भागा मध्येही कोरोना रुणांची संख्या वाढतच आहे आज ग्रामिणचे एकूण १५० प्राप्त अहवालापैकी १२७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले सर्वाधीक राळेरास मध्ये १३ जणांचे अहवाल पॉझिटिव आले तर खामगाव ४ दडशिंगे २ वैराग १ भालगाव १ उंबरगे १ कोरफळे १ असे ग्रामिण मधे २३ रुग्णांची भर पडुन आता ग्रामिणचा एकुण आकडा ५८३ वर पोहचला आहे .

यामुळे शहर व तालुक्यात १३६९ कोरानाचा आकडा पोहचला असला तरी बरे होणाऱ्या संख्येत वाढ होवुन ९१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर आजवर ४६ रुग्ण कोरोना संसर्गाने दगावले आहेत.

गेल्या काही दिवसात शहर व ग्रामिणमध्ये नवनवीन भागात कोरोनाचा शिरकाव होत असल्याने कंटेंनमेंट झोनचीही वाढ होत आहे शहरात १४३ तर ग्रामिण मध्ये ५७ कंटेंनमेंट झोन अस्तित्वात आहे .

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here