नांदेड| : नांदेड जिल्ह्यात आज आलेल्या अहवालात 170 कोरोना2बाधित रूग्णांची भर पडली. तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता ऍक्टीव्ह कोरोना बाधीत रुग्णांची संख्या हजाराला पार करून 1101 एवढी झाली आहे. आजच्या आरटीपीसीआर तपासणीत 147 एवढे रुग्ण आहेत आणि ऍन्टी जेन तपासणीत 23 एवढे रुग्ण आहेत.

जिल्हा शल्य चिकित्स डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेले माहितीनुसार मागील 24 तासात 31 जुलै रोजी गोकुळनगर नांदेड येथील 59 वर्षीय पुरूष, 1 ऑगस्ट रोजी वजिराबाद भागातील 62 वर्षीय महिला आणि 2 ऑगस्ट रोजी वसंतनगर नांदेड येथील 72 वर्षीय पुरूष अशा तीन रुग्णांचा खाजगी रुग्णालयात झाला.

1 ऑगस्ट रोजी जानापूर ता.लोहा येथील 65 वर्षीय पुरूष आणि 2 ऑगस्ट रोजी नारायणनगर नांदेड येथील 50 वर्षीय पुरूष आणि महालिंगी ता.कंधार येथील 59 वर्षीय पुरूष अशा तीन रुग्णाचंा मृत्यू जिल्हा रुग्णालय नांदेड येथे झाला.

तसेच 2 ऑगस्ट रोजी तळ्याची वाडी ता.कंधार येथील 67 वर्षीय महिलेचा मृत्यू सरकारी रुग्णालय नांदेड येथे झाल्याने कोरोना बाधीत मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या 90 झाली आहे. आज सरकारी रुग्णालय 2, मुखेड-7 भोकर-1, लोहा-5, धर्माबाद-3, खाजगी रुग्णायल-1 अशा एकूण 19 ऐवढ्या रुग्णांची सुट्टी झाली आहे.

त्यामुळे आजपर्यंत कोरोना बाधेतून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 954 आहे. आज प्राप्त झालेल्या 576 स्वॅब अहवालांमधील 407 अहवाल निगेटीव्ह आहेत, 170 अहवाल पॉझिटीव्ह आहेत. त्यामुळे आज एकूण रुग्ण संख्या 2156 एवढी झाली आहे.