जगाची अपडेट: आजवर 57 टक्के रुग्ण झाले बरे तर मंगळवारी नव्याने आढळले 2 लाख 8 हजार रुग्ण

0
335

ग्लोबल न्यूज – जगातील एकूण कोरोना संसर्ग एक कोटी 19 लाखांपेक्षा अधिक वाढला आहे. त्यातील 69 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांचे प्रमाण आता 57.74 टक्के झाले आहे. विशेष म्हणजे काल (मंगळवारी) एका दिवसात 2 लाख 08 हजार 243 रुग्ण बरे झाले असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. एकट्या ब्राझीलमध्ये एका दिवसांत 93,614 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. मंगळवारी जगभरात 2 लाख 08 हजार 087 नव्या रुग्णांची भर पडली. त्यापेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा जास्त आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 19 लाख 54 हजार 944 झाली असून आतापर्यंत एकूण 5 लाख 46 हजार 720 (4.57 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 69 लाख 02 हजार 360 (57.74 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 45 लाख 05 हजार 864 (37.69 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 44 लाख 47 हजार 709 (98.71 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 58हजार 155 (1.29 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

1 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 96 हजार 901, कोरोनामुक्त 1 लाख 32 हजार 758, मृतांची संख्या 4 हजार 847

2 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 08 हजार 864, कोरोनामुक्त 2 लाख 278 , मृतांची संख्या 5 हजार 155

3 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 09 हजार 028, कोरोनामुक्त 1 लाख 34 हजार 276 , मृतांची संख्या 5 हजार 170

4 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 89 हजार 413, कोरोनामुक्त 1 लाख 41 हजार 408 , मृतांची संख्या 4 हजार 489

5 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 75 हजार 499, कोरोनामुक्त 97 हजार 176 , मृतांची संख्या 3 हजार 572

6 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 71 हजार 508, कोरोनामुक्त 1 लाख 06 हजार 240 , मृतांची संख्या 3 हजार 583

7 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 08 हजार 087, कोरोनामुक्त 2 लाख 08 हजार 243, मृतांची संख्या 5 हजार 515

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

अमेरिका – कोरोनाबाधित 30,97,084 (+55,442), मृत 1,33,972 (+993)
ब्राझील – कोरोनाबाधित 16,74,655 (+48,584), मृत 66,868 (+1,312)
भारत – कोरोनाबाधित 7,43,481 (+23,135) , मृत 20,653 (+479)
रशिया – कोरोनाबाधित 6,94,230 (+6,368), मृत 10,494 (+135)
पेरू – कोरोनाबाधित 3,09,278 (+3,575), मृत 10,952 (+180)
चिली – कोरोनाबाधित 3,01,019 (+2,462), मृत 6,434 (+50)
स्पेन – कोरोनाबाधित 2,99,210 (+341), मृत 28,392 (+4)
यू. के. – कोरोनाबाधित 2,86,349 (+581), मृत 44,391 (+155)
मेक्सिको – कोरोनाबाधित 2,61,750 (+4,902), मृत 31,119 (+480)


इराण – कोरोनाबाधित 2,45,688 (+2,637), मृत 11,931 (+200)
इटली – कोरोनाबाधित 2,41,956 (+137), मृत 34,899 (+30)
पाकिस्तान – कोरोनाबाधित 2,34,509 (+2,691), मृत 4,839 (+77)
सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 2,17,108 (+3,392), मृत 2,017 (+49)
दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 2,15,855 (+10,134), मृत 3,502 (+192)
टर्की – कोरोनाबाधित 2,07,897 (+1,053) मृत 5,260 (+19)
जर्मनी – कोरोनाबाधित 1,98,355 (+298), मृत 9,103 (+11)
फ्रान्स – कोरोनाबाधित 1,68,810 (+475), मृत 29,933 (+13)
बांगलादेश – कोरोनाबाधित 1,68,645 (+3,027), मृत 2,151 (+55)
कोलंबिया – कोरोनाबाधित 1,24,494 (+4,213), मृत 4,359 (+149)
कॅनडा – कोरोनाबाधित 1,06,167 (+232), मृत 8,711 (+18)

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here