ग्लोबल न्यूज – जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 39 लाख 17 हजार 531 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 2 लाख 70 हजार 720 (6.91 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 13 लाख 44 हजार 120 (34.31 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 23 लाख 02 हजार 691 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 22 लाख 53 हजार 733 म्हणजेच तब्बल 98 टक्के रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 48 हजार 958 म्हणजेच केवळ 2 टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांबरोबरच मृतांच्या संख्येतही लक्षणीय वाढ दिसत आहे.

मागील सहा दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
2 मे – नवे रुग्ण 83 हजार 255 दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 215
3 मे – नवे रुग्ण 81 हजार 725 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 480
4 मे – नवे रुग्ण 83 हजार 255 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 096
5 मे – नवे रुग्ण 85 हजार 991 दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 258
6 मे – नवे रुग्ण 95 हजार 325 दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 811

7 मे – नवे रुग्ण 96 हजार 262 दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 589
अमेरिकेत काल (गुरूवारी) एका दिवसांत 2,129 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना मृतांचा आकडा जवळजवळ 77 हजार म्हणजेच 76,928 झाला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा 12 लाख 92 हजार 623 वर पोहचला आहे. ब्राझीलमध्ये काल 600 तर इंग्लंडमध्ये 539 कोरोनोबाधित मृत्यू नोंदविले गेले. इटलीत 274, जर्मनी 117, फ्रान्स 178, स्पेन 213 तर मेक्सिकोमध्ये कोरोनाचे 197 बळी गेले आहेत.
जागतिक क्रमवारीत आता रशिया पाचव्या स्थानावर
कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत रशिया, ब्राझील, मेक्सिको या तीन देशांना वरचे स्थान प्राप्त झाले आहे. रशिया सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहचला, ब्राझील नवव्या स्थानावरून आठव्या स्थानावर गेला आहे तर मेक्सिकोमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आणि मृतांची संख्या अचानक वाढल्याने 20 व्या स्थानावर पोहचला आहे. फ्रान्स सहाव्या, जर्मनीवर सातव्या, टर्की नवव्या स्थानावर गेला आहे. 20 व्या स्थानावर पोर्तुगाल21 व्या स्थानावर गेला आहे.
कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.
अमेरिका – कोरोनाबाधित 12,92,623 (+29,531), मृत 76,928 (+2,129)
स्पेन – कोरोनाबाधित 2,56,855 (+3,173), मृत 26,070 (+213)
इटली – कोरोनाबाधित 2,15,858 (+1,401), मृत 29,958 (+274)
यू. के. – कोरोनाबाधित 206,715 (+5,614), मृत 30,615 (+539)
रशिया – कोरोनाबाधित 1,77,160 (+11,231), मृत 1,625 (+88)
फ्रान्स – कोरोनाबाधित 1,74,791(+600), मृत 25,987 (+178)
जर्मनी – कोरोनाबाधित 1,69,430 (+1,268), मृत 7,392 (+117)
ब्राझील– कोरोनाबाधित 135,693 (+9,082), मृत 9,188 (+600)
टर्की – कोरोनाबाधित 1,33,721 (+1,977), मृत 3,641 (+57)
इराण – कोरोनाबाधित 1,03,135 (+1,485), मृत 6,486 (+68)
चीन – कोरोनाबाधित 82,885 (+2), मृत 4,633 (+0)
कॅनडा – कोरोनाबाधित 64,922 (+1,426), मृत 4,408 (+176)
पेरू – कोरोनाबाधित 58,526 (+3,709) , मृत 1,627 (+94)
भारत – कोरोनाबाधित 56,351 (+3,364) , मृत 1,889 (+104)
बेल्जियम – कोरोनाबाधित 51,420 (+639), मृत 8,415 (+76)
नेदरलँड – कोरोनाबाधित 41,774 (+455), मृत 5,288 (+84)
सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 33,731 (+1793) मृत 219 (+10)
इक्वाडोर – कोरोनाबाधित 30,298 (+878), मृत 1,654 (+36)
स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 30,126 (+66), मृत 1,810 (+5)
मेक्सिको – कोरोनाबाधित 27,634 (+1,609), मृत 2,704 (+197)