बार्शी : बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथे दि. ३ एप्रिल २०२२ रोजी रात्री दहाचे सुमारास घरासमोरील रस्त्यावर शौचास गेलेल्या रुक्मीणी रघुनाथ ढावारे (वय५०) रा.बळेवाडी या महिलेस मोटरसायकलने धडक दिल्यामुळे, उपचाराकरिता बार्शीतील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दि. ११ एप्रिल २०२२ रोजी रात्री एकच्या सुमारास तिचा मृत्यु झाला.

सदर घटनेत नागेश अंबादास पाचपुते रा. बार्शी याने अविचाराने व हयगयीने मोटरसायकल क्र. एमएच-१३-डीडी-८६१८ चालवून धडक देऊन आईला गंभीर जखमी केले होते. अशी तक्रार मयत महिलेचा मुलगा अनिल रघुनाथ ढावारे (वय २१), रा.बळेवाडी याने बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा