जो मंत्रालयात येऊ शकत नाही तो मुख्यमंत्री हवाच कशाला – नारायण राणे
भाजपाचे राज्यसभा खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा, हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे, अशी जोरदार टीका राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून केली.


सध्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, मंत्रालय नाही, सामान्य माणसाची कुणाला चिंता नाही. बदल्या कोण करतंय कळत नाही, ताळमेळ नाही, काय चाललंय काही समजत नाही असा मिश्किल टोला राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.
हा मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेरच पडत नाही, तो काय काम करणार, असेही नारायण राणे म्हणाले. असा मुख्यमंत्री कुठे सापडणार नाही आणि कुणी ठेवणार पण नाही. दयनीय अवस्था राज्याची असताना हा मुख्यमंत्री डोळे मिटून फक्त लॉकडाऊन करा एवढच बोलतोय,” असेही राणे म्हणाले.