हट्टाला पेटतो त्यालाच मराठा म्हणतात “जंगजौहर”चा टीझर पहिला का ?
सध्या “जंगजौहर” या मराठी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. लेखक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शीक “जंगजौहर” चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झालेला आहे. या टीझरला मराठी प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असून सोशल मीडियावर हा टीझर प्रचंड व्हायरल झाला आहे.

फर्जंद आणि फस्तेशिकस्त या दिग्पाल यांच्या सिनेमांना मराठी प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. हे दोन्ही सिनेमे चांगलेच हिट ठरले होते. ऐतिहासिक चित्रपटांच्या याच सीरिजवर एक पाऊल पुढे टाकत त्यांनी आता पावनखिंडीचा रणसंग्राम जंगजौहर सिनेमाच्या निमित्ताने समोर आणला आहे.

या चित्रपटाची कथा नव्या पिढीला बाजीप्रभूंच्या लढ्याचा इतिहास सांगणार आहे. येत्या वर्षी म्हणजेच जून २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘जंगजौहर’च्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा पुन्हा एकदा दिग्पाल लांजेकर सांभाळणार आहेत. कथेबद्दल जरी माहिती देण्यात आली असली तरी कलाकारांची नाव मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.