‘काय होते तुम्ही, काय झाले तुम्ही’; रोहित पवारांचा नारायण राणेंना टोला
भाजपा प्रदेशाध्यक्ष कार्यलयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. आता खा. राणे यांच्या टीकेला आमदार रोहित पवारांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.


नारायण राणे साहेब मविआ त मतभेद आहेत असे आपण म्हणालात, पण मतभेद हे जिवंत लोकशाहीचं तर आदेश हे हुकूमशाहीचं लक्षण आहे. इथं प्रत्येकजण मत मांडतो. त्यातून मतमतांतरं होत असतात, फक्त त्याला तुम्ही मतभेद असं नाव दिलं. कारण तुमच्याकडं चर्चेची नाही तर एकानेच निर्णय घेण्याची पद्धत आहे असा टोला राणेंना लगावला होता.
दुसरं म्हणजे मला माहित असलेले राणे साहेब सामान्यांच्या प्रश्नावर प्रचंड आक्रमकपणे मुद्देसूद बोलणारे होते. तेच आज लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचत असल्यासारखे वाटले. बेस्टच्या खाजगीकरणावर बोलताना रेल्वेचं खाजगीकरण, इंधन दरवाढ यावर ते शांत बसले’ असे देखील रोहित पवार यांनी बोलून दाखविले होते.1