भारतातून लंडनला बसने जाता येत होते ? वाचा काय आहे नेमके सत्यजगातील सर्वात लांबचा असा हा बसचा रूट होता.

ग्लोबल न्यूज: कलकत्ता ते लंडन 7900 किलोमीटरचा रुट अस्तित्वात होता. ही बस कलकत्ता येथून निघून दिल्ली, अमृतसर, वाघा बॉर्डर, लाहोर (पाकिस्तान), काबूल, हैराण(अफगाणिस्तान), तेहरान ( इराण), इस्तांबुल ( तुर्कस्थान ), बुल्गारिया, युगास्लाव्हिया, आॅस्ट्रीया,जर्मनी,बेल्जियम मार्गे थेट लंडन येथे जात होती. भारतात हि दिल्ली, आग्रा, अलाहाबाद, बनारस करीत कलकत्ता येथे जात.

अल्बर्ट ट्रैवलची हि बस लंडन येथून 15 एप्रिल 1957 रोजी सुरु झाली ती भारतात कलकत्ता येथे 5 जून रोजी पोहचली होती. तेव्हा बसभाडे होते 85 पौंड.( आत्ताचे साधारण 8019 रु.) ही बस 1973 पर्यंत सुरु होती.


या बस प्रवासात सर्व प्रकारची सोय करण्यात आली होती. लक्झरीस बसमध्ये वाचन, वैयक्तिक झोपेचे बंक, पार्टीसाठी रेडिओ / टेप संगीताचा आनंद घेऊ शकत होते.
फॅन, हीटरची सुविधा उपलब्ध होती. शॉपिंग साठी काही दिवस राखीव होते, त्यात तुम्ही दिल्ली, तेहरान, काबुल,इस्तांबुल ,साल्जबर्ग, विएन्ना येथे ती करु शकत होते.