बार्शी : वांगरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आ. राजेंद्र राऊत गटाच्या १२ जागा बिनविरोध झाल्या असून, या सोसायटीवर आ. राजेंद्र राऊत यांनी निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.
आ. राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून शाहू साळुंखे, संजय तुपे, भारत काकडे, राजेंद्र तुपे, वाजीद पठाण, झुंजार घाडगे, सुधीर तुपे, तानाजी तुपे, महिला सर्वसाधारण गटातून सौ.स्वाती खडूळ, सौ.लतीकला जगताप, इतर मागासवर्गीय गटातून अभिमान शिंदे, अनुसूचित जाती जमाती गटातून दगडू लोखंडे हे बारा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

या विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांचे, आ. राजेंद्र राऊत यांनी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी रावसाहेब तुपे, भगवान घोलप, मनोज काळे, मंझूर पठाण, बळीराम तुपे, अनंत जगताप उपस्थित होते.