बार्शी :राष्ट्रवादीचे तत्कालीन गटनेते नागेश अक्कलकोटे प्राणघातक हल्ला प्रकरणात नगरसेवक विजय राऊत सह तीन जणांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेला अटकपूर्व जामीन प्रकरणी याचिका माघार घेण्यात आली. तदनंतर उच्च न्यायलयाने याचिका डिसमिस केली न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या समोर सुनावणी झाली . याच हल्ला प्रकरणात दुसऱ्यांदा राऊत यांना उच्च न्यायालयात माघार घ्यावी लागली आहे. अशी माहिती अॅड विकास जाधव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली .

यावेळी माजी मंत्री दिलीप सोपल, सुधीर भाऊ सोपल नागेश अक्कलकोटे उपस्थित होते .या प्रकरणी सुमारे 1 तासापेक्षा जास्त काळ सुनावणी घेतल्यानंतर; पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींच्या बाजूने वागल्याने न्यायमुर्तींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच, राऊत यांच्या अटकेच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास इच्छुक नसल्याचेही न्यायाधीशांनी सूचित केले. त्यामुळे, आरोपींना जामीन अर्जावर तपशीलवार आदेश हवा आहे की आरोपींना अटकपूर्व जामीन अर्ज मागे घ्यायचा आहे का, असा सवाल न्यायालयाने शेवटी आरोपीच्या वकिलांना विचारला. वकिल मुंदर्गी यांनी आरोपींकडून माहिती घेण्यासाठी थोडा वेळ मागितला. वकिल मुंदर्गी यांनी जामीन प्रकरणी अर्ज माघारी घेत असल्याचे घोषणा केली; त्यामुळे उच्च न्यायलयाने अर्ज डिसमिस केला आहे.

१ ऑगस्ट २०१४ रोजी अक्कलकोटे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ८४/२०१४ भा.द.वि. १४३, १४७, १४८, ३०७, ३२९, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४९ व आर्म अॅक्ट २५ (२) प्रमाणे विजय राऊत, दिपक राऊत, सोन्या हाजगुडे, मुन्ना बोते, डंग्या यादव, दिपक धावारे, रणजित चांदणे, प्रकाश राऊत, विशाल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
राऊत यांच्या वतीने अॅड अशोक मुंदर्गी
अॅड विरेश पुरवंत अॅड ऋषिकेश काळे यांनी तर अक्कलकोटे यांच्यावतीने अॅड अभिजित कुलकर्णी व सरकार च्या वतीने अॅड पी एच गायकवाड यांनी काम पाहिले .