वैराग : येथील छत्रपती शिवाजी शॉपींग सेंटर बार्शी रोड वरील असलेले व्यापारी गाळे धारकाची कडक वसुली मोहीम नागरपंचायतच्या मुख्याधिकारी विना पवार यांच्या आदेशानुसार करण्यात येत असून गुरुवारी दि२३ रोजी मोठे थकबाकीदार असलेले नऊ गाळे सील करण्यात आले,वैराग नगरपंचायत ची निवडणूक सुरू असतानाच व्यापारी गाळे सील करण्याची मोहीम सुरू असल्याने गाळेधारकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

यामध्ये गणेश महामुनी थकबाकी १,४२, ४००,सागर अन्नदाते ९४८००,
अप्पासाहेब गुंजाळ १,९४,३००,
प्रीतमसिंह बायस १,९८,२००,
कोमल थिटे , १,२५,०००
राजाभाऊ इंगळे ६१,०००
विराज अन्नदाते १, ४०,०००
रईस बागवान १, ०९,४०० अशा एकूण ९ गाळे यांची एकुण रक्कम रु ११ लाख थकित असल्याने सील करण्यात आले आहेत.

वसुली पथकामध्ये नगरपंचायतचे कर्मचारी अहमद शेख, विलास मस्के, सुदाम खेंदाड, इसाक शेख, रामचंद्र प्रभाळकर, सचिन पानबुडे, किरण वाघमारे, फैयाज शेख, रफिक शेख, बाळू भेंडे या वसुली पथकाने ही कारवाई केली. अजून बाकीचे सर्व गळ्याचे वसुली होईपर्यंत वसुली चालूच राहणार आहे असे मुख्यधिकारी विना पवार यांनी माहिती दिली.