उत्तरप्रदेश : गुंड विकास दुबे पोलीस चकमकीत ठार…!
कानपुर पोलीस हत्याकांडाचा मुख्य आरोपी विकास दुबे सकाळी ६:०० वाजता पोलीस चकमकीत ठार झाला आहे. त्याला कानपुर पोलीस उज्जैनहून कानपूरला कोर्टात हजर करण्यासाठी नेत असताना त्या दरम्यान पोलिसांची गाडी ही महामार्गावर उलटली.


याच संधीचा फायदा घेत विकास दुबे याने पोलिस कर्मचाऱ्याजवळ असेलेल्या सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्या झटापटी दरम्यान गाडी उलटल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर विकास दुबे यांने पोलिसांच्या उलट दिशेने पळताना गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारात विकास दुबे हा ठार झाला आहे.
या सर्व घटनेत रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु होता त्याच दरम्यान विकास दुबे आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू होती ही संपूर्ण माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे, अजून सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.