टेंभुर्णी : पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे येथील टोलनाक्याजवळ वाहन तपासणी करीत असताना मद्यधुंद कंटेनर चालकाने तपासणीसाठी थांबलेल्या सागर चोबे (वय ३३, राहणार बार्शी ) या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावरच कंटेनर घातल्याने चोबे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी मोडनिंब महामार्ग पोलीस गस्त पथक हे वरवडे टोल नाकानजीक वाहन केसेससाठी थांबलेले असताना हैदराबाद हुन मुंबईला निघालेला आयशर टेम्पो क्र. एम एच ०४ एचडी झिरो ०१७० ने समोर आलेल्या महामार्ग पोलीस पथकातील पोलीस नाईक सागर औदुंबर चोबे (वय ३४ रा. अलीपूर रोड बार्शी जिल्हा सोलापूर) यांना धडक दिली.

या घटनेत श्री चौबे जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा,मुलगी असून पाकणी सोलापूर महामार्ग पोलिस पथकातील विशाल चोबे यांचे ते बंधू होत.

मयत सागर चौबे हे मोडनिंब येथील महामार्ग सुरक्षा पथकात कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना हा अपघात घडला आहे. शवविच्छेदनासाठी सागर चोबे यांचा मृतदेह टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.त्यांच्या मृत्यूने पोलीस दलात तसेच बार्शीत हळहळ व्यक्त केली जात आहे.