उडान फाउंडेशनची सामाजिक कार्यात भरारी;लॉकडाउन काळात गरजूंना ईदच्या निमित्ताने 500 कुटुंबांना किट आणि 500 रु पाकिट भेट.

बार्शी:येथील सामाजिक संघटना सामाजिक उपक्रमात अग्रसर असणारी,सतत वेगवेगळे उपक्रम घेऊन लोकोपयोगी काम करणारी संघटना उडान फाऊंडेशन यांच्याकडून रमजान ईदचे औचित्य साधून 500 गरजू,गरीब व विधवा स्त्रियांना किट देण्यात आले.

यात काजू,बदाम,चारुळे,पिस्ता,खसखस,मनुके,शेवया,खजूर,गूळ याचा समावेश होता.तसेच प्रत्येक व्यक्तीला 500 रुपयांचे पाकिट देखील देण्यात आले.कोरोना काळात लोकांच्या हाताला काम नाही.अशावेळी ते सण कसा साजरा करणार याच भुकितेतून हे पाऊल उचलले.

यावेळी कर्यक्रम यशस्वी करण्यासाठी उडानचे अध्यक्ष इरफान शेख,उपाध्यक्ष इलियास शेख,जफर शेख,अय्युब शेख,शोयब काझी,मुन्ना बागवान,जमील खान,इन्नुस् शेख,मोईन नाईकवाड़ी,वसीम मुलाणी,तौसीफ बागवान,शब्बीर वस्ताद,शकील मुलानी,बाबा शेख,एड.रियाज शेख,जावेद शेख,जिलानी शेख,साजन शेख,रोनी सैय्यद ,मोहसिन पठान,इकबाल शेख,हाजी शिकलकर,इरफान आयबी,जमीर तांबोळी,समीर शेख,अल्ताफ शेख यांनी अथक परिश्रम घेतले.