बार्शी : काही लोक वाळूची चोरून वाहतूक करीत आहेत अशी बातमी मिळाल्याने, बार्शी तालुका पोलिसांनी दि. ५ एप्रिल २०२२ रोजी पहाटे चारचे सुमारास बार्शी तालुक्यातील उंडेगाव स्टँडसमोरील रस्त्यावर दोन टेंपोंना थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये अवैध वाळू दिसून आली.
पांढऱ्या रंगाचा ४०७ टेम्पो (चालक मोहसीन आतार रा.कोरफळे, ता.बार्शी व मालक बापू गुजले रा.पानगाव, ता.बार्शी) नं. एमएच-१२, एआर-३१५० मध्ये २ ब्रास वाळू व विटकरी रंगाचा ६०८ टेम्पो (चालक व मालक गजानन मोरे रा.पानगाव ता.बार्शी) नं. एमएच-१२, एफ-९८०६ मध्ये अर्धा ब्रास वाळू मिळून आली.
महसूल विभागाचा परवाना व रॉयल्टी पावती नसताना अवैध वाळू वाहतूक केल्यामुळे, दोन्ही वाहने व वाळू मिळून ३ लाख ६७ हजार रुपये किंमतींचा माल जप्त करुन टेंपो चालक मालकाविरुध्द भा.द.वि.क. ३७९,३४ पर्यावरण संरक्षण कायदा कलम १९८६ चे कलम ९, १५ प्रमाणे बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
