बार्शी-कुर्डुवाडी रोडवर ट्रक व छोटा हत्ती यांच्यात धडक होवुन जागीच दोन मयत तर नऊ जण गंभीर जखमी

0
573

वांगरवाडी नजीक ट्रक व छोटा हत्ती यांच्यात धडक होवुन जागीच दोन मयत तर नऊ जण गंभीर जखमी

बार्शी :

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी – कुर्डुवाडी रोडवरील वांगरवाडी नजीक पराग हॉटेलजवळ भर पावसात ट्रक व छोटा हत्ती यामध्ये जोराची धडक होवून या अपघातात दोन जण जागीच मयत तर ९ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार सायंकाळी पाऊणेपाचच्या सुमारास घडली.

हयगयीने अविचाराने भरधाव वेगाने ट्रक चालवुन जोराची धडक दिल्या प्रकरणी चालक आश्राप्पा अच्युत माळी( रा मुरुड जि. लातुर) याच्या विरुद्ध बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे

या अपघातात छोटा हत्ती वाहन चालक आशिष अजित सातारकर (रा शितल हॉटेल जवळ बार्शी ) गणेश हरी काळे रा लातुर हे जागीच मयत झाले . तर पुनम पवार रवि पवार रंजना पवार कोमल पवार निलम पवार मनिषा पवार अमोल पवार , अमोल बबन पवार सर्व ( रा. पारधी कॅम्प बार्शी ) असे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत त्यांचेवर बार्शी येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक माहीती की प्रत्यक्षदर्शी प्रताप नवनाथ जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की जगताप हे मोटर सायकल वरून आपल्या गावी वांगरवाडी येथे परतत असताना पराग हॉटेल नजीक इक्बाल तांबोळी यांचे शेताजवळ आले असता बार्शी कडुन ट्रक क्रमाक एम एच ८ एच २६२३ हा भरधाव वेगाने जात होता तर कुर्डुवाडीच्या दिशेने येत असलेल्या छोटा हत्ती वाहन क्र एम एच १४ जी डी ६४३३ यास जोराची धडक दिल्याने या छोटा हत्ती वाहनातील प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत . यावेळी स्वता फिर्यादी ट्रक किन्नर व परिसरातील नागरीकांच्या मदतीने घटना स्थळावरुन जखमींना तात्काळ उपचारासाठी बार्शी येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी तालुका सपोनी शिवाजी जायपात्रे यांनी तसेच पोलीस पथकांनी भेट देऊन पाहणी केली.


Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here