सबहेड : वेळीच ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल…इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही अशी एक ना अनेक अश्वसने देऊन पालकमंत्री यांनी उरकती आढावा बैठक घेतली मात्र, तीन दिवसानंतरही परस्थिती जैसे थे आहेच… सोमवारी ऑक्सिजनअभावी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
बार्शी : दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत तर वाढतच आहे शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. यातच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेही रुग्णांना जीवाशी मुकावे वाहत आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला तर केवळ पुरेसा ऑक्सिजनमिळाला म्हणून नाही तर रुग्णांची स्थिती बिकट होती यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे व्यवस्थापकीय अधिकारी बन्सीलाल शुक्ला यांनी सांगितले.

येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून उपचारासाठी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. असे असतानाच शुक्रवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकही पार पडली. यामध्ये सर्वकाही औषधउपचार वेळेत पुरविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.पण सोमवारी पहाटे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये बार्शी तालुक्यातील चुंब येथील अश्रूबाई सांगळे (65) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे वय अधिकचे होते तर त्यांना इतर आजार असून उपचार दरम्यान ते प्रतिसाद देत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जनाबाई बंडगर (सोलापूर) वय, 70 यांचा देखील याच दरम्यान, मृत्यू झाला आहे. रविवारी रात्रीपासून ऑक्सिजनची कमतरता होती. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते तर मृत्यू नंतरही कोणीही वैद्यकीय अधिकारी फिरकले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहे. केवळ ऑक्सिजनची कमतरता यामुळेच या दोन दुर्घटना घडल्या नाहीत तर या रुग्णांना इतरही आजार होते. शिवाय अधिकचे वय असल्याने त्यांनी उपचारासाठी प्रतिसाद दिला नसल्याचे बन्सीलाल शुक्ला यांनी सांगितले आहे. शिवाय यामध्ये काही गैर असल्यास चौकशी करावी यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असेही शुल्का यांनी सांगितले.