एटीएम फोडणाऱ्या दोन अभियंत्यांना अटक, 66 लाखांची रोकड जप्त

0
749

ग्लोबल न्यूज – दिघी येथील माऊलीनगर व वडमुखवाडीत असलेल्या एसबीआय बँकेच्या दोन एटीएम मशीन फोडून 66 लाखांची रोकड लंपास करणा-या दोन अभियंत्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने गुरुवारी (दि.8) ही कारवाई केली.

मनोज उत्तम सूर्यवंशी (वय 30, रा. पिंपरी वाघिरे, पिंपरी ) किरण भानुदास कोलते ( वय 35, रा. चिखली) (दोघेही मूळ रा. जळगाव ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी व्यवसायाने अभियंता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी येथील माऊलीनगर व वडमुखवाडीत असलेल्या एसबीआय बँकेच्या दोन एटीएम मशीन बनावट चावीच्या सहाय्याने खोलून 66 लाखांची रोकड चोरी झाल्याची तक्रार 24 सप्टेंबर रोजी दिघी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण राज्य होऊ शकते अनलॉक ; राजेश टोपे यांचे संकेत

याप्रकरणी तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांच्या कडील अधिकारी व कर्मचारी यांच्या दोन टिम तयार करण्यात आल्या.

तपास दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांना मिळालेल्या माहीतीवरून पिंपरी पुणे येथे सापळा रचून दोन संशयित आरोपींना दुचाकीसह (एमएच 19 बीटी 2499) ताब्यात घेतले.‌ चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

“मी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता की…” म्हणत विठूरायासमोर नमस्तक झाले मुख्यमंत्री

पोलिसांनी त्यांच्याकडून एटीएम मधून चोरी केलेली 66 लाख 10 हजार 100 व 60 हजार किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखा युनिट तीन करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त ( गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उप निरीक्षक गिरीश चामले, कर्मचारी – हजरत पठाण, यदू आढारी, सचिन मोरे, सागर जैनक, त्रिनयन बाळसराफ, प्रवीण पाटील, गंगाधर चव्हाण, योगेश्वर कोळेकर, राजकुमार हनमते, राहुल सूर्यवंशी, विठ्ठल सानप, महेश भालचिम, प्रमोद ढाकणे, नाथा केकाण, गजानन आगलावे व नागेश माळी यांनी केली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here