शहिद जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ वृक्षारोपण; वृक्ष संवर्धन समिती बार्शीचा कौतुकास्पद उपक्रम
बार्शी : आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून १९६५ पासून देशासाठी लढताना वीरमरण प्राप्त झालेल्या बार्शी तालुक्यातील १६ शहीद जवानांच्या नावांने एक एक देशी झाड लावण्यात आले. तसेच या प्रत्येक झाडांना त्या त्या शहीद जवानांच्या नावांचे नामफलक ही लावण्यात आले.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


उल्लेखनीय बाब म्हणजे, माजी सैनिकांच्याच हस्ते तसेच आणि गुरुजनांच्या साक्षीने माता-भगिनींच्या समवेत ही झाडे लावण्यात आली.
या वेळी माजी सैनिक संघटना बार्शीचे पदाधिकारी,कामगार नेते तानाजी ठोंबरे,माजी प्राचार्य चंद्रकांत मोरे, मराठा सेवा संघाचे किरण गाढवे, माजी प्राचार्य शशिकांत धोत्रे, पत्रकार, वृक्ष संवर्धन समिती बार्शीचे पदाधिकारी उपस्थित होते.
