ग्लोबल न्यूज : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकरी अधिकारी विक्रम कुमार यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर गायकवाड यांची साखर आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.

सुरुवातीपासूनच पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात झाला. कोरोनाच्या बळींची संख्याही वाढत गेली. त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी बदली होणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. अखेर गायकवाड यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला. गायकवाड यांची साखर आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

तर पीएमआरडीएचे मुख्य कार्यकरी अधिकारी विक्रम कुमार यांची पुणे महापालिका आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर गायकवाड यांची साखर आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. कुमार यांच्या जागी राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, साखर आयुक्त सौरव राव यांची पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात स्पेशल ड्युटी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.