बार्शीतील वाहनधारक व व्यापाऱ्यांना शिस्त लावणार-पो. नि. रामदास शेळके
शहर पोलीस स्टेशन चा घेतला पदभार
बार्शी: मला शिक्षकांची भूमिका चागली जमते. हातात काठी घेऊन शिस्त लावण्याचे काम करणार. बार्शी म्हणजे खूप भयानक असे ऐकून होतो. इथे भगवंत असल्याने वाईट असणार नाही. राजकिय आमच्या पाचवीला पुंजलेले आहे. ते कसे हँडल करायचे हे आम्हाला वरिष्ठांनी शिकवले आहे. पहिल्याच दिवशी बाजारात फेरफटका मारला असता याठिकाणच्या वाहनधारकांना आणि व्यापाऱ्यांनाही शिस्त नसल्याचे दिसून आले. त्यांना शिस्त लावण्यासाठी कोणाला त्रास होणार असेल तर तो सहन करण्याची मानसिकता ठेवा असा इशारा बार्शी शहर पोलीस स्टेशन चे नूतन पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिला.


बदली झालेले पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्याकडून शेळके यानी पदभार घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना शेळके म्हणाले, गिरीगोसावी यांनी चांगले काम करून दुसऱ्याला कामाला लावले. मला पाहिजे तसे काम मी पोलिसांकडून करून घेणार. गोसावी यांनी घालून दिलेली शिस्त पुढे चालू ठेवणार. तसेच ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांचे ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्याची माझी भूमिका असणार आहे.
शहरात वाहनांची व व्यापाऱ्यांना ही शिस्त नाही. सर्वांना सोबत घेऊन ती लावणार. हॉस्पिटल भरपूर आहेत.विद्येचे माहेरघर आहे. ट्रॅफिकला शिस्त लावताना कोणाला त्रास होणार असेल तर तो सहन करा.चुकीचे काम करणार नाही. अडचण असल्यास कधीही संपर्क साधा असे आवाहन त्यानी केले. संतोष गिरीगोसावी यांनी सर्व पोलीस अधिकारी, व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे चांगले काम करता आल्याचे सांगितले.