सरकारमध्ये समन्वय नसल्याने शरद पवार यांच्यावर मध्यस्थी करण्याची वेळ – देवेंद्र फडणवीस
ग्लोबल न्यूज: राज्य सरकारमध्ये तीन पक्षांची सत्ता असून तीन सत्ताकेंद्र आहेत.त्यामुळे त्यात कुठेही समन्वय दिसत नाही.अलीकडेच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गोंधळ होता.त्यात नुसती गडबड नव्हे तर कुरघोडी सह संवादहीनता आहे.या परिस्थितीत सरकारमधील समन्वय व अर्तंमतभेद हे प्रमुख कारण आहे.म्हणून शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागते;हे दुर्देव आहे,असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


फडणवीस यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समस्या समजून घेण्यासाठी उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असताना बुधवार(ता.8) नाशिकमध्ये भेटी दिल्या. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
ते म्हणाले,मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना न सांगता परस्पर बदल्या करायच्या. नंतर त्या रद्द करायच्या.त्यावर ज्येष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करायची.असे पहिल्यांदाच घडले आहे.यातून अधिकारी,प्रशासनाला वाईट संदेश गेला.यामुळे शीस्त रहात नाही,असे त्यांनी सांगितले.