सोलापूर ःसोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज सोमवारी 260 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून बरे होऊन 207 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 9 हजार 716 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात 932 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 260 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 672 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 260 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 167 पुरुष आणि 93 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 9716 झाली आहे.
आज बार्शी तालुक्यातील पांगरी येथील 93 वर्षाची महिला, अलीपूर रोड येथील 70 वर्षाची महिला, कोरफळे येथील 90 वर्षाचे पुरुष, मोहोळ तालुक्यातील पेनुर येथील 67 वर्षांचे पुरुष, कुरुल येथील 42 वर्षांचे पुरुष, करमाळा तालुक्यातील हिवरे येथील 42 वर्षांचे पुरुष, मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील 45 वर्षाचे पुरुष, पंढरपुरातील तुंगत येथील 50 वर्षाचे पुरुष, माढा तालुक्यातील कुंभेज येथील 70 वर्षाची पुरुष यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

या गावात आढळले नवे कोरोनाबाधित
बार्शीतील अलीपूर रोड, भवानी पेठ, दत्तनगर, ढगे मळा, देशमुख प्लॉट, फुले प्लॉट, गाडेगाव रोड, घोडके प्लॉट, घोळवेवाडी, गोरमाळे, कापसे बोळ, कासारवाडी, खडकलगाव, कोरफळे, कोष्टी गल्ली, मांगाडे चाळ, मुसळे प्लॉट, नाळे प्लॉट, राऊत गल्ली, राऊत प्लॉट, सोलापूर रोड, सुभाष नगर, उपळे दुमाला, उपळाई रोड, वैराग,

करमाळ्यातील कमलाई नगर, केम, विद्यानगर, माढ्यातील भोसरे, कुर्डू, कुर्डूवाडी, न्हैसगाव, मोडनिंब, रिधोरे, सन्मती नगर, टेंभुर्णी, वडशिंगे, माळशिरस मधील अकलूज, माळेवाडी, माळीनगर, मळोली, मांडवे, संगम, संग्रामनगर, उंबरे दहिगाव, उंबरे वेळापूर, यशवंनगर,

मंगळवेढ्यातील दामाजी नगर, सलगर बुद्रुक, मोहोळ तालुक्यातील अनगर, बेगमपूर, भावल्या मारुती चौक, कोरवली, नरखेड, समर्थनगर, येणकी, उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची, कोंडी तांडा, पंढरपुरातील आढीव, आंबेडकर नगर, मुक्ताई मठाच्या पाठीमागे, भंडीशेगाव, भोसे, बोहाळी, चळे, चंद्रभागा घाट, फुलचिंचोली, गांधी रोड, गाताडे प्लॉट, घनश्याम सोसायटी, गोकुळ नगर, गोपाळपूर, गुरसाळे, इसबावी, जळोली, जुना कराड नाका,
जुनी पेठ, कडबे गल्ली, कान्हापुरी, करकंब, कासार गल्ली, खर्डी, किष्ते गल्ली, क्रांती चौक, लिंक रोड, महावीर नगर, महादेव नगर, मार्केट यार्ड, माऊली नगर, नांदोरे, नवी पेठ, नेमतवाडी, नवीन कराड नाका, पंचायत समिती, रामबाग, संत पेठ, सरगम चौक, शेळवे, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, स्टाफ क्वार्टर, टाकळी रोड, तुंगत, उमदे गल्ली, उंबरे पागे, सांगोल्यातील चिंचोली रोड, गायगव्हाण, महूद, मांजरी, मेथवडे, शिवाजीनगर,

पअक्कलकोट मधील करजगी, कोर्सेगाव, म्हैसलगी, मुंढेवाडी, सांगवी, वागदरी, दक्षिण सोलापुरातील आहेरवाडी, बक्षी हिप्परगा, फताटेवाडी, होटगी, कुंभारी, एनटीपीसी, शिंगडगाव याठिकाणी आज नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.