सभा घेणारे अन उपस्थित राहणाऱ्यांचे दोन डोस पूर्ण असणे गरजेचे, अन्यथा 50 हजार दंड व गुन्हे दाखल होणार
प्रतिनिधी वैराग :वैराग नगरपंचायत निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोरोना महामारी चे सर्व नियम सक्तीने पाळण्याचे आदेश प्रांत अधिकारी हेमंत निकम यांनी दिली असून मोडणाऱ्या वरती कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी यावेळी बोलताना सांगितले की ,एक डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीत अर्ज भरण्याची मुदत आहे. चार व पाच डिसेंबरला सुट्टी आहे. उर्वरित पाच दिवसात अर्ज खरेदी करताना अथवा भरताना कोरोना नियमांचे पालन करावे लागेल. निवडणूक कक्षात उमेदवारांसह एकूण पाच जणांना प्रवेश देण्यात येईल.
अपक्ष उमेदवारांना पाच तर राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवार एक सूचक आवश्यक आहे.अर्ज भरताना जात पडताळणी पत्र आवश्यक असणार आहे. राखीव उमेदवारास पाचशे रुपये तर सर्वसाधारण उमेदवारास एक हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. आठ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी १३ डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत चिन्हांचे वाटप आणि २१ डिसेंबरला मतदान होईल तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून जाहीर सभांना ही मर्यादा राहणार आहेत.

खुल्या जागेत त्यांच्या २५ टक्के बंदी जागेत क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती असावी लागणार आहे. सभेला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना देखील लसीकरणाचे दोन डोस पूर्ण होणे गरजेचे आहे. दोष न घेता जर उपस्थित राहिल्याचे लक्षात आले तर आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून ५० हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात येणार आहे.
सतरा मतदान केंद्रांमध्ये १४ हजार ७६२ मतदारांची संख्या आहे.वैराग शहरातील१७ प्रभागांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १७ मतदान केंद्र असणार आहेत. यामध्ये सात हजार ५६१ पुरुष तर ७ हजार २०० महिला आणि एक तृतीयपंथी असे एकूण १४ हजार ७६२ मतदार आहेत. या १७ नगरसेवकांमधून नऊ महिलांना संधी मिळणार असून आठ पुरुष निवडून येणार आहेत.
मतमोजणी वैरागमध्येच होणार: –
यापूर्वी वैराग ग्रामपंचायतीसह प्रत्येक निवडणुकीची मतमोजणी ही बार्शीच्या गोडाऊन मध्येच होत आली आहे, मात्र प्रथमच निवडणूक होत असलेल्या वैराग नगरपंचायतीची मतमोजणी देखील वैराग मध्ये पहिल्यांदाच होणार आहे त्यासाठी प्रांताधिकारी हेमंत निकम आणि मुख्याधिकारी विना पवार प्रयत्नशील असून मतमोजणी पूर्वी तीन दिवस अगोदर स्थळ घोषित केले जाणार आहे.