यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट, वाचा शासनाची नियमावली….!

0
298

यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट, वाचा शासनाची नियमावली….!

राज्यात खासकरून मुंबई कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे यंदा गणेशोत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्याचे मुंबईतील अनेक मोठ्या मंडळांनी आधीच जाहीर केले आहे. त्यातच सरकारकडून गणेश उत्सव साजरा करण्यासाठी काही अटी आणि नियम लागू करण्यात आले आहे. हे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, गणेश मूर्तीची उंची कमी करण्याबरोबरच गणेश मंडळांना अनेक नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यंदा भक्तांना मंडपात जाऊन दर्शन घेता येणार नाही. तसेच हार, फुले सुद्धा अर्पण करता येणार नाही. गणपतीचे आगमन, आरती आणि विसर्जन सुद्धा मोजक्याच भक्तांना घेऊन करावे लागणार आहे. तसेच कोरोनाचे संकट असल्याने दिवसातून तीन वेळा मंडप निर्जंतुकीकरण करावेत आणि मंडप सजावट, देखावे, रोषणाई यांना मुरड घालून मंडळातर्फे जनजागरण, रक्तदान, आरोग्य तपासणी असे कार्यक्रम आयोजित केले जावे असे सरकारने सुचविले आहे.

१) एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते मंडपात उपिस्थत राहू नये.
२) प्रत्येकांनी मास्क लावणे बंधनकारक आहे.
३) दिवसातून तीन वेळा संपूर्ण मंडपाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक आहे.
४) आगमन, विसर्जन याप्रसंगी मिरवणूक काढता येणार नाही. केवळ दहा कार्यकर्त्यांची उपस्थिती बंधनकारक
५) जनजागरण, रक्तदान, आरोग्य तपासणी असे कार्यक्रम आयोजित केले जावे. व्यावसायिक जाहिरातींनाही प्रतिबंध.
६) भजन, कीर्तन असे कार्यक्रम आयोजित करता येणार नाही.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here