बिग ब्रेकिंग : आता डॉक्टरांच्या चिट्टीशिवाय ही होणार कोरोना चाचणी; वाचा सविस्तर-
ग्लोबल न्यूज: कोरोनाच्या वाढत्या संकटात अनेकांना कोरोनाच्या भीतीने ग्रासले आहे. त्यामुळे मला सुद्धा कोरोना झालेला आहे का? या विचारणे अनेकजण व्यथित झाले आहे मात्र डॉक्टरांच्या चिट्टीशिवाय कोरोनाची टेस्ट करता येत नाही त्यामुळे अनेकजण कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली तरी डॉक्टरांकडे जाण्याचे टाळत असत. आता आपल्याला याची चिंता करण्याची गरज नाही. आता आपण डॉक्टरांच्या चिट्टीशिवाय कोरोना तपासणी करु शकता.


नुकतीच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सर्व राज्यांना पत्र लिहून कोरोना तपासणीसाठी डॉक्टरांच्या चिट्टीची सक्ती त्वरित रद्द करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.
अनावश्यक डॉक्टरांच्या परवानगीमुळे सरकारी रुग्णालयांमध्ये अधिक दबाव आहे, असे राज्यांना सांगण्यात आले आहे. या नियमामुळे सामान्य लोकांना कोरोना चाचणी घेण्यास बराच विलंब होत आहे.
आयसीएमआरने पुढे लिहिले आहे की, राज्यातील सर्व चाचणी प्रयोगशाळांना कोणत्याही वैद्यकीय स्लिपशिवाय चाचणी घेण्यास परवानगी देण्यात यावी. त्याचबरोबर केवळ सरकारी डॉक्टरांकडूनच तपासणी स्लिप घेण्याची गरज नाही. सर्व खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांनाही तपासणीस परवानगी देण्याचा अधिकार मिळायला हवा. या निर्णयामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना शोधण्यास नक्कीच मदत होणार आहे.