सुराज्य रक्षणासाठी ही संघटना राज्यभर काम करील- छत्रपती संभाजीराजे
तुळजापूर / प्रतिनिधी-
हे श्रीचे राज्य सुराज्य करण्यासाठी या संघटनेची निर्मिती केली असुन सुराज्य रक्षणासाठी ही संघटना राज्यभर काम करुन प्रस्थापीतांच्या विरोधात विस्थापीत्यांना न्याय देणार असुन वेळे प्रसंगी राजकारणात उतरण्यास ही संघटना मागेपुढे पाहणार नाही,असे प्रतिपादन छञपती संभाजीराजे यांनी केले.


मंगळवार दि. ९ रोजी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन स्वराज्य संघटनेचा शुभारंभ व ध्वजाचे विमोचन व पहिल्या शाखेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्रसंगी स्वराज्यसंघटना राजकारणात उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही , मुखमंञी एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यासाठी लक्ष केंद्रित करावे छञपती संभाजीराजे यांनी असे आवाहन केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, आज तुळजापूरात आई भवानीच्या मंदिरासमोरून स्वराज्य संघटनेची सुरुवात होत आहे. आमच्याकडे लोकांसारखा पैसा नाही. काही जण म्हणतील की हे मधूनच कुठून आले? केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे, शाहू महाराजांचे वंशज आहे म्हणून हे करत आहेत. मात्र, मी माझा राजवाडा २० वर्षांपासून सोडून दिला आहे. माझं वैभव सोडून दिलं आहे. महिन्यात पाच दिवसांपेक्षा जास्त मी तिथे राहत नाही.
महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला असुन त्यास हेक्टरी ७५ हजार रुपये तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली . यावेळी शिवप्रेमी मोठ्या संखेने उपस्थितीत होते.